:
“लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे तीन वेळा निवडून आलेले खासदार दिलीप गांधी यांच्यासारखे अनुभवी, सिनिअर उमदेवार आहेत. यामुळे बाहेरून भाजपमध्ये डोकाविणाऱ्यांना थारा नाही. त्यांनी भाजपमध्ये डोकावू नयेत,’ असा सल्ला पालकमंत्री राम शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री प्रा. शिंदे पत्रकारांशी बोलत होते.
निवडणूकांच्या तोंडावर कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे पवार यांच्या कुटूंबियांचे दौरे वाढले आहेत. विशेष करून रोहीत पवार तुमच्या मतदार संघात जास्त डोकावत आहेत. यावर पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, “मी माझ्या विकासकामांतून उत्तर देत आहे. पवारांना काय करायचे ते करू द्या. निवडणुकाजवळ आल्यावर लोक असं करतातच. मतदारसंघाच्या शोधात फिरतात. चकरा मारतात. ते ही तेच करत आहेत. डोकंवर काढत आहेत. मतदारसंघात 10 वर्षात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. मतदार विकासकामांमुळे माझ्यावर खूश आहे. तेच विरोधकांना उत्तर देतील.’

No comments:
Post a Comment